काणकोण कलाकार संघाकडून पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम, विद्यार्थ्यांकडून निबंधवाचन
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या शालेय विद्यार्थ्यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभिनेत्री स्व. आशालता वाबगावकर यांच्या स्मृतींवरील पडदा खोलतानाच भावपूर्णरीत्या त्यांना आदरांजली अर्पण केली. काणकोण कलाकार संघाने स्व. आशालता यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात खास आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नव्या पिढीला स्व. आशालता वाबगावकर यांच्या नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील योगदानाची जाणीव व्हावी, त्यांच्या कार्याची महती कळावी या हेतूने यावेळी तालुक्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनावर आधारित निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तालुक्यातील एकूण 13 मुलांनी भाग घेतला. त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने आशालता यांचा जीवनपट उलगडला.
यात अपेक्षा गजानन बोळणेकर, श्री मल्लिकार्जुन विद्यालय, विधिता दत्ता कोमरपंत, श्री मल्लिकार्जुन उ. मा. विद्यालय, मनस्वी मारूती देविदास, सरकारी माध्यमिक विद्यालय, श्रीस्थळ, सना गेविंद गावकर, तुडल हायस्कूल, वंश पागी, सरकारी माध्यमिक विद्यालय, गवळ-खोल, सौम्या प्रभू अग्रासनी, निराकार विद्यालय, माशे, भार्गवी राजेश पै, श्रद्धानंद विद्यालय, पैंगीण, श्रेया दिनकर मेस्त्राr, बलराम डे केअर शाळा, मोखर्ड, अश्विता वेळीप, आंगले उ. मा. विद्यालय, माशे, स्वरांगी नाईक, बलराम उ. मा. विद्यालय, अर्धफोंड, समृद्धी संजय कोमरपंत, बलराम निवासी शाळा, आमोणे, रिया नारायण कोमरपंत, सरकारी माध्यमिक विद्यालय, सादोळशे, संजना वेळीप, गुरुकुल विद्यालय, मलोरे-खोल या विद्यार्थ्यांनी आपले निबंध सादर केले.
या समारंभाला गोवा आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक रामानंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर काणकोण कलाकार संघाच्या संस्थापकांपैकी असलेले विकास देसाई, कमलाकर महाळशी, अजित पैंगीणकर, डॉ. धिलोन देसाई, सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रgसांव या शैक्षणिक संस्थेच्या आमसभेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, सचिव गुरू गावकर, कलाकार संघाचे अध्यक्ष अनिल फळदेसाई आणि तालुका सुकाणू समितीच्या अध्यक्षा मीना कामत उपस्थित होत्या.
स्व. आशालता यांच्या दुसऱया स्मृतिदिनापूर्वी त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी जे निबंध सादर केले आहेत त्यांची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असून दरवर्षी हा दिवस कलाकार संघाने पाळायचा असे यावेळी ठरविण्यात आले. म्हाळशी यांनी आशालता यांच्या गर्द सभोवती या पुस्तकासंबंधी माहिती दिली. विकास देसाई, अजित पैंगीणकर, डॉ. धिलोन देसाई, राजेंद्र देसाई, मीना कामत आणि रामानंद जोशी यांनी आशालता यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सादर केले. श्री मल्लिकार्जुन विद्यालयाने सभागृहात कलाकारांची छायाचित्रे लावावीत, अशी सूचना जोशी यांनी यावेळी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पलाश अग्नी यांनी तयार केलेली आणि अनीश अग्नी यांचे निवेदन असलेली आशालता यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखविण्यात आली. अनिल फळदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनोज ना. गावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलखुश खोलकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भानुदास ना. गावकर, सुभाष कोमरपंत, सूरज कोमरपंत, दत्ता कोमरपंत, गोसावी यांनी विशेष मेहनत घेतली.