क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्सच्या वतीने 5 डिसेंबरपासून ग्रामीण भाग मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात
आहे.
नरसेवाडी गायरान हलशी येथील मैदानावर स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 41 हजार रूपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला 25 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा ग्रामीण भागासाठी खुली असून इच्छुक संघानी आपली नावे संगीता स्वीटस, काकतीवेस रोड, हॉटेल देशी कट्टा, स्वरूप प्लाझा-टिळकवाडी, सागर पान शॉप, बजाज शोरूम समोर खानापूर, ऋषी कम्युनिकेशन नंदगड किंवा लक्ष्मी शॉप हलशी येथे 3 डिसेंबर पर्यंत नोंदवावीत.अधिक माहितीसाठी रघुनाथ देसाई, वैभव देसाई याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.