नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
समर्थ सोसायटी, लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील दत्त मंदिराचा वर्धापन दिन गुरुवार दि. 18 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त नुकताच हिंडलगा येथील नूतन ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, सदस्य परशराम कुडचीकर, प्रवीण पाटील, अशोक कांबळे, गजानन बांदेकर, रेणुका भातकांडे, अलका कित्तूर, स्नेहल कोलेकर, प्रेरणा मिरजकर या सर्वांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून शैलजा वाघराळे व तेजस लुगडे यांनी काम पाहिले. स्पर्धकांना समर्थ महिला मंडळाच्या सदस्या वृषाली उचगावकर यांनी भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शेखर दळवी होते. समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. समर्थ सांस्कृतिक मंडळाचे सेपेटरी दत्ताजी कानुरकर यांनी प्रोत्साहनपर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती औंधकर यांनी केले.