जोधपूर, अजमेरसाठी विशेष रेल्वे
प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने 10 नवीन उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केल्या आहेत. बेंगळूर-अजमेर व बेंगळूर-जोधपूर या बेळगाववरून धावणाऱया दोन गाडय़ांचा समावेश आहे. हुबळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (मुंबई) ही उत्सव स्पेशल रेल्वे 31 डिसेंबरपर्यंत धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे.
हुबळी-मुंबई रेल्वे दिवाळीपूर्वी सुरू करण्यात आली होती. उत्सव स्पेशल रेल्वे म्हणून 1 डिसेंबरपर्यंत ही रेल्वे धावणार होती. या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे अजून महिनाभर रेल्वे सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. हुबळी, बेळगाव, मिरज भागातून मुंबईला जाणाऱया प्रवाशांना ही रेल्वे सोयीची ठरत आहे.
बेंगळूर-अजमेर उत्सव स्पेशल
बेंगळूर शहरापासून उत्तर भारतात जाण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने विशेष उत्सव स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत. यातील बेंगळूर-अजमेर (क्र. 06205-06) ही साप्ताहिक रेल्वे 11 ते 25 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. प्रत्येक शुक्रवारी ही रेल्वे बेंगळूर येथून तर सोमवारी अजमेर येथून निघणार आहे. बेंगळूर, अनंतपूर, गुंडकल, बेळ्ळारी, होसपेट, कोप्पळ, गदग, हुबळी, धारवाड, लोंढा, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, कर्जत, लोणावळा, कल्याण, भिवंडी, वसई रोड असे थांबे असणार आहेत.
बेंगळूर-जोधपूर उत्सव स्पेशल
बेंगळूर-जोधपूर (क्र. 06534-33) ही साप्ताहिक रेल्वे 13 ते 27 डिसेंबर दरम्यान धावणार आहे. प्रत्येक रविवारी बेंगळूर येथून तर प्रत्येक बुधवारी जोधपूर येथून निघणार आहे. बेंगळूर, गुंडकल, बेळ्ळारी, होसपेट, कोप्पळ, गदग, हुबळी, धारवाड, लोंढा, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, कर्जत, लोणावळा, कल्याण, भिवंडी, वसई रोड हे थांबे घेत जोधपूरला पोहचणार आहे.