वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आशियाई हॉकी फेडरेशनतर्फे हॉकी इंडियाच्या प्रशिक्षकांसाठी तसेच तांत्रिक अधिकाऱयांसाठी हॉकीचे ज्ञान अधिक उपलब्ध व्हावे याकरिता ऑनलाईनद्वारे कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. सदर कार्यशाळेच्या प्रक्रियेला 19 जुलैपासून प्रारंभ होईल.
हॉकी इंडियाचे प्रशिक्षक तांत्रिक अधिकारी, पंच, व्यवस्थापक हे या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. आशियाई हॉकी फेडरेशनची भारतातील हॉकी कार्यशाळेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आशिया खंडातील इतर देशांमध्ये अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. या कार्यशाळेतील विविध आठ वर्कशॉपमध्ये प्रत्येकी सहा उमेदवारांना संधी दिली जाईल. आशियाई हॉकी फेडरेशनच्या भारतात होणाऱया या कार्यशाळेत एकूण 25 प्रशिक्षक आणि 15 तांत्रिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.