वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या प्रशिक्षण, पंच आणि तांत्रिक विभागातील अधिकाऱयांसाठी या महिन्यात आशियाई हॉकी फेडरेशनतर्फे तीन शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. सदर कार्यशाळाचे कामकाज ऑनलाईनद्वारे होणार असल्याची माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत आशियाई हॉकी फेडरेशनने प्रत्येक 30 दिवसांच्या अंतराने प्रशिक्षक, पंच आणि तांत्रिक अधिकारी यांच्यासाठी यशस्वीपणे कार्यशाळा घेतल्या गेल्या. चालू महिन्यात होणाऱया शैक्षणिक कार्यशाळेमध्ये 12 ते 30 प्रशिक्षक आणि पंचांचा गट ऑनलाईनद्वारे होणाऱया कार्यशाळेत सहभागी होणार आहे. भारताच्या हॉकी पंच, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱयांना या ऑनलाईनवरील कार्यशाळेपासून अधिक ज्ञान मिळते. ही कार्यशाळा मोफत राहणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱया सर्व उमेदवारांना सर्टीफिकेट दिले जाणार आहे. ऑनलाईनद्वारे शैक्षणिक कार्यशाळा 19, 20 आणि 27 जूनला आयोजित केल्या आहेत.