वृत्तसंस्था/ अबु धाबी
अफगाणचा फिरकी गोलंदाज रशीद खानला पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत (पीएसएल) खेळण्यासाठी इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील ससेक्स संघाने परवानगी दिली आहे.
रशीद खानने इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी यापूर्वी इसेक्स संघाबरोबर करार केला होता. पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत रशीद खान लाहोर कलंदर्स संघाकडून खेळणार आहे. सहाव्या पाक सुपर लीग स्पर्धेत रशीद खानने यापूर्वी लाहोर कलंदर्स संघाकडून केवळ दोन सामन्यांत आपला सहभाग दर्शविला होता. त्यानंतर त्याला अफगाणच्या राष्ट्रीय संघाकडून दुसऱया मालिकेत खेळण्यासाठी जावे लागले होते. रशीद खानला इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील पाच सामन्यांत खेळणे किंवा पूर्ण आगामी पाक सुपर लीग स्पर्धेत खेळणे यापैकी एक प्रर्याय निवडणे जरूरीचे होते. पाकच्या असंख्य क्रिकेट शौकिनांनी रशीद खानला पाक सुपर लीग स्पर्धेत खेळवण्याची इच्छा दर्शविली होती. दरम्यान ससेक्स संघाने रशीद खानला पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास परवानगी दिली आहे.
सहाव्या पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामने आता अबु धाबीत 9 ते 24 जून दरम्यान खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धा यापूर्वी अर्धवट स्थितीत तहकूब करण्यात आली होती.