वार्ताहर / काकती
होनगा येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी हिंदू धर्मदाय चॅरिटेबल इन्डोमेंट खात्याच्या अधिकाऱयांनी श्री काळभैरवनाथ मंदिर येथील जीर्णोद्धार मंडळासोबत बुधवारी बैठक घेतली.
बैठकीत जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष राजाराम पाटील, देवस्थानचे पुजारी महादेव बसवाणी पुजारी, संजय शिंदोळकर, माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा आनंदाचे, सुरेश कुंभार, बाबू सांबरेकर आदींनी श्री काळभैरवनाथ व श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासह शिल्लक निधीतून निवासीगृह बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. धर्मदाय ट्रस्ट खात्याचे असिस्टंट कमिशनर एस. पी. जेरेगल, जिल्हा धार्मिक परिषदेचे चिंतामणी ग्रामोपाध्याय, विठ्ठल हुबळी, आदींनी देवस्थानबाबत हवी असलेली माहिती जीर्णोद्धार कमिटीकडून मागून घेतली. व सरकारी नियमानुसार जीर्णोद्धार कमिटीची स्थापना करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत उत्तर देताना मंदिर जीर्ण झाल्याने मंदिराच्या भिंती ढासळत होत्या. परिणामी भाविकांना मोठा धोका होता. जीर्णोद्धार कमिटी रजिस्टर करण्यासाठी कार्यालयीन कामकाजाबाबत विलंब झाला, असे जीर्णोद्धार कमिटीने सांगितले. धर्मदाय ट्रस्टतर्फे प्रमुख कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी इनिस्पेक्टर इन्डोन्मेंट अधिकारी शितल एन. कडेट्टी, सुपरिटेंडेंट इन्डोन्मेंट अधिकारी बाळेश अबसाई आदी उपस्थित होते.
यावेळी होनगा ग्रा. पं. अध्यक्ष विजय व्हनमनी, ग्राम विकास अधिकारी सुमित्रा मिर्जी, सेक्रेटरी दीपक गवी, काकती ग्रा. पं. सेक्रेटरी अरुण नाथबुवा, प्रदीप सांबरेकर, बसू नाईक तर देवस्थान रक्षण समितीचे रमेश चिकोर्डे, राजू पाटील, सुर्याजी बिर्जे, संजय भोसले, उमेश देसाई, मनोहर पाटील, सुंदर अरचाली, भाऊसाहेब चिकोर्डे आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.