शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
होळी, रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी येथील मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. तब्बल दोन वर्षांनंतर रंगोत्सव साजरा होणार आहे. कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात आल्यामुळे उत्सव होणार आहे. होळीत रंगाचा बेरंग होईल, अशी कृती कोणीच करू नये, अशी सूचना मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी केली आहे.
गुरुवार दि. 17 मार्च रोजी होळी, दुसऱया दिवशी शुक्रवारी रंगोत्सव होणार आहे. नागरिकांनी उत्साहाने रंगोत्सवात भाग घ्यावा. या काळातही कोरोना नियमांचे पालन करावे, डॉल्बीचा वापर करू नये, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आवाजाची मर्यादा पाळावी, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांनी केल्या.
रंगोत्सवावेळी मानवी शरीराला हानीकारक ठरेल, अशा रासायनिक रंगाचा वापर करू नये, अनोळखींवर बळजबरीने रंग फेकू नये, अशा सूचना करण्यात आल्या. होळी आणि रंगोत्सवाच्या काळात व्यापक बंदोबस्त असणार आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही पोलीस अधिकाऱयांनी दिला.
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सुनील जाधव, अभिजित आप्टेकर, नगरसेवक राजू भातकांडे, प्रताप मोहिते, संजय नाईक, उत्तम नाकाडे, साई कणेरी यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.