पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी
प्रतिनिधी
बांदा
बांदा गावचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर मंदिरच्या भक्त निवाससाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी पंचायत समिती सभापती श्री. शीतल राऊळ यांनी मागणी केली होती.बांदा गाव महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असल्याने दर्शनासाठी येणा-या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन भक्त निवास व्हावे यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी पं.समिती सभापती शीतल राऊळ यांनी मागणी केली होती. याला यश आले असून या भक्त निवासासाठी दहा लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे माननीय पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.