12 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर, 14 विधानसभा अन 2 लोकसभा मतदारसंघात 17 एप्रिल रोजी मतदान ः 2 मे रोजी निकाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने 12 राज्यांमधील 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा मंगळवारी केली आहे. याचबरोबर कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातील लोकसभेच्या एका मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. सर्व मतदारसंघांमध्ये 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राजस्थानातील 3 तर मध्यप्रदेशातील एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राजस्थानात सहाडा, सुजानगढ आणि राजसमंद मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. सहाडा मतदारसंघ काँग्रेस आमदार कैलास त्रिवेदी आणि सुजानगढ मतदारसंघात मास्टर भंवरलाल यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. तर राजसमंद मतदारसंघ भाजप आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणार आहे. तर उदयपूर जिल्हय़ातील वल्लभनगर मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.
मध्यप्रदेशात दमोह विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस अमादार राहुल सिंग लोधी भाजपमध्ये सामील झाल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे.
राज्यनिहाय पोटनिवडणूक
विधानसभा
राजस्थान (3 जागा) ः सहाडा, सुजानगढ, राजसमंद
मध्यप्रदेश (1 जागा) ः दमोह
गुजरात (1 जागा) ः मोरवा हदफ
महाराष्ट्र (1 जागा) ः पंढरपूर
उत्तराखंड (1 जागा) ः सल्ट
झारखंड (1 जागा) ः मधुपूर
कर्नाटक (2 जागा) ः बसवकल्याण, मस्की
मिझोरम (1 जागा) ः सेरछिप
नागालँड (1 जागा) ः नोकसेन
ओडिशा (1 जागा) ः पिपिली
तेलंगणा (1 जागा) ः नागार्जुन सागर
लोकसभा मतदारसंघ
आंध्रप्रदेश (1 जागा) ः तिरुपती
कर्नाटक (1 जागा) ः बेळगाव