ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या हडपसर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय मुलाने मोकळय़ा जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुक्या प्राण्यावरील अत्याचाराच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
याप्रकरणी 16 वर्षीय मुलाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 28 वर्षीय गायमालकाने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुण्यातील फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात राहतात. 13 डिसेंबरला त्यांनी आपली जर्सी गाय घराच्या पाठीमागील मोकळय़ा जागेत बांधली होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास 16 वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. गायमालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने हडपसर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ मुलावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.