पुणे / प्रतिनिधी :
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहा आणि युनिट एकच्या पथकाने दोन कारवाईमध्ये गावठी पिस्तूल विक्री करणारे सात सराईत आरोपी जेरबंद केले आहेत. त्यांच्या ताब्यातून 23 लाख 81 हजार रुपये किमतीचे 17 पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी दिली.
याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (वय- 24, रा. जवळवाडी, तालुका- पाथर्डी, जिल्हा ), प्रदीप विष्णू गायकवाड (वय-25 ,रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, मु. रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे (वय-25 ,रा. वडुले, तालुका-नेवासा, अहमदनगर), अमरापुरता शेवगाव अहमदनगर), ऋषिकेश सुधकर वाघ (वय- 25, रा. सोनई ,अहमदनगर ), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय- 25, रा. घडले परमानंद, तालुका-नेवासा, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक पेट्रोलिंग करत असताना, 25 फेब्रुवारी रोजी पोलीस पथकास पिस्तूल विक्री करणारे दोन डीलर वाघोली परिसरातील नानाश्री लॉज याठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड यांना महिंद्रा कारसह अटक केली.
अधिक वाचा : पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाचे संकेत