वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारात दररोज नवनवीन विक्रम नोंदवले जात आहेत आणि याच तेजीच्या स्थितीत काही कंपन्यांनी आपला आयपीओ आणण्याची तयारी केली आहे. यामध्ये रेल्वे कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी) यांच्या पाठोपाठ आता रंग उत्पादक कंपनी इंडिगो पेन्ट्सने आपला आयपीओ सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी आपला आयपीओ येत्या 20 जानेवारी रोजी उघडणार असून 22 जानेवारी रोजी बंद करणार असल्याची माहिती आहे.
आयपीओच्या अंतर्गत कंपनी 300 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखणार आहे. यासाठी प्राईस ब्रँड 1488 ते 1490 रुपये निश्चित केले आहे. यामध्ये 300 कोटी रुपयांचे ताजे समभाग राहणार असून याच्या आधारे कंपनीच्या प्रमोटर्स आणि इन्वेस्टर्स 58.40 लाख समभागांची विक्री करणार आहेत.
ऑफर फॉर सेलमध्ये 20.05 लाख समभाग सीकोया कॅपिटल इन्वेस्टमेंट चारमध्ये 21.65 लाख इक्विटी समभाग एससीआय इन्वेस्टमेंट्स पाच आणि 16.7 लाख इक्विटी समभाग प्रमोटर हेमंत जालान विकणार आहेत. पुणे येथे सदरची कंपनी असून 70,000 इक्विटी समभाग कर्मचाऱयांच्या सब्सक्रिप्शनसाठी ठेवण्यात आले आहेत.