डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्य मोठय़ा जोमाने सुरू असून गट समितीतील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रीयपणे काम करीत आहेत. सध्या या मतदारसंघात पक्षाचे बुथ पातळीवर कामाला प्रारंभ केला असून लोकांचाही पाठिंबा चांगला आहे. त्यावरून मये मतदारसंघात 2022 च्या विधानसभा मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत जाणार व पुन्हा हा मतदारसंघ बहुजन समाजातील नेत्याचे नेतृत्व येणार, असा विश्वास पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी मये येथे व्यक्त केला.
मये मतदारसंघ गोवा फॉरवर्ड पक्षाची गट बैठक गावकरवाडा मये येथील महामाया वाचनालयात बैठक संपन्न झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरण कांदोळकर बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, सरचिटणीस तथा मयेतीत नेते संतोषकुमार सावंत, मये गटाध्यक्ष प्रदीप नाईक, युवा अध्यक्ष समरेश वायंगणकर व आनंद पार्सेकर यांची उपस्थिती होती.
मये मतदारसंघाला मोठा राजकीय इतिहास आहे. या मतदारसंघात अनेक अनुभवी व जे÷ कार्यकर्ते सध्या आमच्या पक्षात असल्याने त्याचा लाभ गोवा फॉरवर्ड पक्षाला होणार आहे. सध्या या मतदारसंघातील 44 पैकी 24 बुथ समित्या काढण्यात आलेल्या आहेत, तर येत्या डिसेंबर पर्यंत उर्वरित 20 बुथच्या समित्या निवडल्या जाणार आहेत. त्यानंतर महिला व युवा समित्यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत.
स्व. अनंत शेट यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य म्हणजे जनतेची सत्य भावना.
मये मतदारसंघात गेल्या काही दिवसांपूर्वी आपण माजी आमदार तथा माजी सभापती स्व. अनंत शेट हे भाजपच्या राजकीय खेळीचा बळी ठरले हे वक्तव्य सत्यच आहे. आज स्व. शेट यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाले हे सर्वश्रुत आहे. मये मतदारसंघातील जनतेने याविषयी आपल्याकडेही अनेकवेळा हि भावना व्यक्त होती. सदर भावना लोक उघडपणे बोलू शकत नव्हते, पण ती आपण मयेतच जनतेसमोर मांडली. सदर वक्तव्य म्हणजे वस्तुस्थिती आहे. एक शांत व सुस्वभावी नेता भाजपच्या राजकीय खेळीचेच बळी ठरले. आपण जे काही बोललो त्यात गैर काहीच नाही, असा दावाही किरण कांदोळकर यांनी केला. आपल्यावर भाजपने तक्रार केली म्हणून काहीच फरक पडत नाही. असेही ते पुढे म्हणाले.
मये आमदारां?नी चार वर्षांत काय केले ते दाखवावे.
मये मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्य वाढतच आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते सक्रीयपणे काम करीत असल्याने येत्या निवडणुकीत या मतदारसंघात मोठी मजल मारण्यासाठी पक्ष सज्ज होत आहे. येत्या जानेवारी महिन्यात मयेत पक्षाचा मोठा मेळावा घेतला जाणार आहे. या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी पक्षाचा वेगळा जाहिरनामा असणार आणि त्यानुसार या मतदारसंघाचा विकास साधला जाणार आहे. गेल्या चार वर्षांत विद्यमान आमदारांनी आपल्या जाहिरनाम्याप्रमाणे कोणती कामे केली ते दाखवावे. असे आव्हान मयेतीत नेते संतोषकुमार सावंत यांनी यावेळी केले.