आज बजावणार मतदानाचा अधिकार
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून बेळगाव जिल्ह्यात 39 लाख 67 हजार 574 मतदार असून यापैकी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या 20 हजार 424 आणि दिव्यांग, वृद्ध अशा 1 लाख 42 हजार 856 मतदारांपैकी काहींनी यापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आज 39 लाख 47 हजार 150 सर्वसामान्य मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बेळगाव जिल्ह्यात 39 लाख 67 हजार 574 पैकी 94 हजार 652 मतदार नवोदित आहेत. सदर मतदार 18 ते 19 वयोगटातील असून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सरकारी सेवेत असलेल्या मतदारांचे मतदान पोस्टल बॅलेटद्वारा घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यावेळी 80 वर्षांवरील मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच दिव्यांग आणि रुग्णांनादेखील घरातून मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. याकरिता निवडणूक आयोगाने विशेष सेवा उपलब्ध करून दिली होती. वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना घर बसल्या मतदान करण्यासाठी बीएलओंकडे अर्ज देऊन आपली इच्छा व्यक्त करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यात 1 लाख 95 ज्येष्ठ मतदार आहेत. त्याचप्रमाणे 42 हजार 761 दिव्यांग मतदार असून 151 तृतीयपंथी मतदार आहेत. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे यापूर्वीच त्यांचे मतदान घेण्यात आले आहे. 39 लाख 47 हजार 150 मतदार सर्वसामान्य असून आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव उत्तर मतदारसंघात 2 लाख 51 हजार 246 आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघात 2 लाख 48 हजार 52 मतदार आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव ग्रामीणमध्ये 2 लाख 57 हजार 241 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एरव्ही 55 ते 60 टक्के मतदान होते. मतदान अधिक होण्यासाठी निवडणूक आयोगाने जागृती मोहीम राबविली होती. तसेच बीएलओंमार्फत प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन स्लिपचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आज किती टक्के मतदान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- मतदारसंघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी एकूण
- बेळगाव उत्तर 1,24,092 1,27,143 11 2,51,246
- बेळगाव दक्षिण 1,24,922 1,23,119 11 2,48,052
- बेळगाव ग्रामीण 1,30,106 1,27,126 9 2,57,241
- खानापूर 1,09,732 1,02,922 10 2,12,664
- कित्तूर 98176 96087 5 1,94,268
- बैलहोंगल 97607 97233 2 1,94,842
- सौंदत्ती यल्लम्मा 99976 99306 2 1,99284
- रामदुर्ग 1,03,354 99931 9 203294
- निपाणी 1,13,856 1,11,823 9 2,25,688
- चिकोडी-सदलगा 1,12, 437 1,11,388 9 2,23,834
- अथणी 1,16,641 1,11,499 4 2,28,144
- कागवाड 99574 95430 4 1,95,008
- कुडची 99043 94096 14 1,93,153
- रायबाग 1,08,127 1,02,369 9 2,10,505
- हुक्केरी 1,03,117 1,03,449 8 2,06,574
- अरभावी 1,24,244 1,23,404 8 2,47,656
- गोकाक 1,25,635 1,28,996 19 2,54650
- य् ामकनमर्डी 1,00,217 1,00,822 8 2,01,047