काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडू येथे शनिवारी पहाटे 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. लोक झोपेत असताना झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे लोक घाबरून झोपेतून उठले आणि घराबाहेर पळू लागले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दुपारी 2.36 वाजता भूकंपाची नोंद केली. त्याचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 15 किमी अंतरावर असलेल्या भक्तपूर जिह्यात होता. या भूकंपाचे धक्के काठमांडू खोऱयातही जाणवले. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री 12.37 वाजता भूकंप झाला.