उपग्रह प्रक्षेपणाची आता तयारी
4 दशकानंतर हिमालयीन देश नेपाळला त्याचा जियोस्टेशनरी ऑर्बिटल स्लॉट मिळाला आहे. म्हणजेच नेपाळला पृथ्वीवरील अंतराळात स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी एका कक्षा निर्धारित करण्यात आली आहे. नेपाळ टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (एनटीए) आता स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे.
स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित केल्याने नेपाळचे कोटय़वधी रुपये वाचणार आहेत. इंटरनेट टेलिकम्युनिकेशन युनियनने (आयटीयू) नेपाळला 1984 मध्ये ऑर्बिटल स्लॉट दिला होता. पण पृथ्वीवरील कक्षांमध्ये अधिक ट्रफिक असल्याने त्याला उपग्रह प्रक्षेपणाची अनुमती मिळत नव्हती.
नेपाळमध्ये आता दूरसंचार यंत्रणा विकसित होत असून नवे धोरण लागू होणार आहे. याचमुळे नेपाळच्या सरकारने सप्टेंबर महिन्यात आयटीयूकडे स्वतःचा स्लॉट देण्याची मागणी केली होती.
नेपाळच्या उपग्रह प्रकल्पावर सुमारे 35 अब्ज नेपाळी रुपे खर्च होणार आहेत. म्हणजेच भारतीय चलनात 2190 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. परंतु याच्या मदतीने नेपाळ सरकार स्वतःच्या डीटीएच सॅटेलाइट सर्व्हिसचा बँडविथ आणि 50 अन्य सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन चॅनल्सचे वार्षिक भाडे वाचवू शकणार आहे.
जियोसिंक्रोनस सॅटेलाइट्स ऑर्बिट पृथ्वीच्या भूमध्यरेषा म्हणजेच इक्वेटरच्या बरोबर वर 36 हजार किलोमीटरवर असते. हे उपग्रह स्वतःच्या कक्षेत एकाच ठिकाणी स्थिर राहतात. नेपाळला दोन रेडिओ ऑर्बिटल स्लॉट मिळाले आहेत. फिक्स्ड सॅटेलाइड सेवेसाठी ईस्ट लाँगिटय़ूडवर 123.3 अंश तर ब्रॉडकास्टसाठी 50 अंश पूर्वेत स्थान मिळाले आहे.