उत्तर प्रदेशातील आग्रा या शहरात दोन युवतींचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चुकून कचराकुंडीत फेकले गेले. कचरा टाकत असताना ते त्यांच्या शरीरावरून निसटले, पण ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. यावेळी दागिने हरविल्याचे लक्षात आले. तेव्हा कचरा उचलला गेला होता.
तो कचरा ज्या ठिकाणी टाकला गेला होता, तेथे नंतर शोधाशोध सुरू झाली. अनेक टन कचरा साठवलेल्या त्या जागेतून 10 ग्रॅम वजनाचे दागिने शोधणे म्हणजे वाळवंटात पडलेली सुई शोधण्यासारखेच होते. पण आग्रा महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी या अगतिक युवतींचे रडवेले चेहरे पाहून दागिने शोधण्याचे मनावर घेतले. अखेरीस 50 टन कचऱयाची छाननी केल्यानंतर हे तीन दागिने मिळाले आणि या युवतींचा जीव भांडय़ात पडला. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना अशा प्रकारे आऊट ऑफ वे जाऊन मदत करणाऱया या महानगरपालिका कर्मचाऱयांचेही नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यांनी कचरा शोधण्यास नकार दिला असता तर दागिने मिळणे अशक्मयातील बाब होती. कारण या युवतींना स्वतः इतक्मया मोठय़ा कचऱयाच्या ढिगातून दागिने सापडणे अशक्मयच होते. या कामात त्यांच्या शेजाऱयांनीही त्यांना मोलाची मदत केली होती. दागिने शोधण्यासाठी तब्बल सहा तास खटपट करावी लागली. रुची आणि अनुष्का अशी या युवतींची नावे आहेत. त्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.