संकट अधिकाधिक गडद : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱयाचा मृत्यू : 49 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / ओरोस:
‘ब्लॅक एप्रिल’ नंतरही सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवारी कोरोनामुळे अकराजणांनी या जगाचा निरोप घेतला. या आपत्तीत जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांचे एक्स-रे काढणाऱया एक्स-रे टेक्निशियनचाही या कोरोनाने बळी घेतल्याने कोविडवर उपचार करणाऱया कर्मचाऱयांमध्येही खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकूण 337 रुग्ण दगावले आहेत. शनिवारी नव्याने 583 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले, तर 49 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला.
जिल्हय़ात अतिदक्षता विभागात असलेल्या 310 रुग्णांपैकी 276 रुग्ण ऑक्सिजनवर असून, प्रकृती नाजूक बनलेल्या 34 रुग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता जिल्हय़ात 1370 बेड उपलब्ध करून देण्यात आले असून त्यातील 731 बेडवर रुग्ण दाखल आहेत.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : शनिवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 583, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13,015. सद्यस्थितीतील एकूण सक्रिय रुग्ण 2,596, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण शनिवारी 49, तर आतापर्यंत 10,076. मृत झालेले शनिवारी 11 तर आतापर्यंत 337.
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 121 रुग्ण
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 45, दोडामार्ग – 41, कणकवली – 111, कुडाळ – 121, मालवण – 71, सावंतवाडी – 76, वैभववाडी -34, वेंगुर्ले – 42, जिल्हय़ाबाहेरील – दोन.
तालुकानिहाय आजपर्यंत मिळालेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 1275, दोडामार्ग – 685, कणकवली – 3323, कुडाळ – 2645, मालवण – 1449, सावंतवाडी – 1678, वैभववाडी – 849, वेंगुर्ले – 1012, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 99.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 292, दोडामार्ग – 133, कणकवली – 532, कुडाळ – 470, मालवण – 422, सावंतवाडी – 292, वैभववाडी – 207, वेंगुर्ले – 194, जिल्हय़ाबाहेरील – 54.
तालुकानिहाय आजपर्यंतचे एकूण मृत्यू : देवगड – 34, दोडामार्ग – नऊ, कणकवली – 83, कुडाळ – 51, मालवण – 42, सावंतवाडी – 60, वैभववाडी – 34, वेंगुर्ला – 22, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – दोन.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस्: तपासलेले नमुने शनिवारी 1333, एकूण 64 हजार 997 पॉझिटिव्ह आलेले नमुने 9,064.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : शनिवारी 185, एकूण 36 हजार 087. पैकी पॉझिटिव्ह 4,013.
जिल्हय़ात आणखी अकराजणांचा मृत्यू
शनिवारी आणखी 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील 58 वर्षीय महिला, मालवण-आंबेरी येथील 71 वर्षीय महिला, जिल्हय़ाबाहेरील मालेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, कणकवली-ओटव येथील 34 वर्षीय पुरुष, वैभववाडी-बुरंबावडे येथील 62 वर्षीय पुरुष, मालवण आचरा येथील 70 वर्षीय पुरुष, कणकवली-पळसंब येथील 67 वर्षीय महिला, कुडाळ येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 36 वर्षीय महिला, कणकवली-आशिये येथील 56 वर्षीय महिला, सावंतवाडी-शेर्ले येथील 55 वर्षीय पुरुष आदींचा सामावेश आहे.
एक्स-रे टेक्निशियनचा कोरोनाने मृत्यू
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा कोरोनामुळे मृत्यू होऊन एक आठवडा उलटत नाही तोच याच रुग्णालयातील कोविड रुग्णांचे एक्स-रे काढणारे युवा एक्स-रे टेक्नीशियन इम्रान शहा (वय 30) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. इम्रान हे जिल्हा रुग्णालयात कोविड डय़ुटीवर असताना त्यांना गावी वडील आजारी असल्याचा निरोप आल्याने ते तातडीने अमरावती येथील आपल्या गावी निघाले होते. गावी पोहोचताच त्यांनादेखील कोविडचा त्रास जाणवू लागल्याने ते अत्यवस्थ झाले. त्यांना उपचाराकरिता जागा मिळेपर्यंत उशीर झाला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.