प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून न्यायालये बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल ऑनलाईन व व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात येत होता. आता पुन्हा 6 जूनपर्यंत न्यायालये बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने तसे नोटीफिकेशन पाठविले आहे.
संपूर्ण देशातच कोरोनामुळे सर्व व्यवसाय आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत. न्यायालयेही बंद ठेवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दीड महिन्यापूर्वीच दिला होता. त्यानुसार न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता 6 जूनपर्यंत पुन्हा न्यायालये बंद ठेवण्यात येणार आहेत. पूर्वीप्रमाणेच महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल ऑनलाईन व व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिला जाणार आहे.