बेळगाव : स्वतंत्र दिनानिमित्त उपस्थित अविनाश पोतदार, डॉ. एम. डी. दीक्षित आदी.
अरिहंत हॉस्पिटलमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे अविनाश पोतदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित व अभियंता बकूल जोशी उपस्थित होते.
स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, आम्ही रुग्णसेवेच्या हेतूने अरिहंत हॉस्पिटलची स्थापना केली आहे. कमी कालावधीत हॉस्पिटलने गरूड भरारी घेतली आहे. या माध्यमातून आम्ही वर्षभरात 12 हजारहून अधिक ओपीडी रुग्ण, अडीच हजारहून अधिक रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अवघ्या वर्षभरात 800 रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून 1800 हून अधिक रुग्णांची अंजिओग्राफी व अंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अभिमानास्पद म्हणजे उत्तर कर्नाटकात 5 टावी शस्त्रक्रिया करणारे एकमेव अरिहंत हॉस्पिटल आहे. हे सर्व आमचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व मेहनतीमुळे शक्य झाले आहे.
यावेळी डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. वरदराज गोकाक, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. सुरज पाटील, हॉस्पिटलचे व्यवस्थापक मल्लेश यड्डी यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.