माजी आमदार किरण कांदोळकर यांची माहिती : भाजपला रामराम ठोकण्याचे संकेत : स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पक्षाची तत्वे संपल्याचा आरोप
प्रतिनिधी / म्हापसा
राज्यात राजकीय क्रांती घडणार आहे. आम्ही 8 मतदार संघ टार्गेट केले असून आठ मतदार संघातील आमदार एकत्रित येऊन एक नवीन क्रांतिकारक क्षत्रीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात भाजपला जनता कंटाळली असून भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. कार्यकर्त्यांना या पक्षात महत्त्व नाही. आपण हळदोणा मतदार संघातून येती विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती माजी आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे माजी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी दिली. येत्या काही दिवसात भाजपला रामराम ठोकणार असल्याचे संकेतही कांदोळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. हळदोणा नवीन सरपंचाची निवड झाल्यावर माजी आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. कांदोळकर बोलत होते.
भारतीय जनता पार्टीही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झालेली आहे. कार्यकर्त्यांना या पक्षात महत्त्वच नाही. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर या पक्षाची सर्व तत्त्वे संपली. पर्रीकर आज जीवंत असते तर याकाही गोष्टी कदापी घडल्या नसत्या. थिवी वासियांनी आपली राजकीय कारकीर्द घडविली. मी थिवी वासियांना असाच सोडू शकत नाही. येत्या विधान सभेच्या निवडणुकीत थिवी व हळदोणा मतदार संघातून कांदोळकर हाच उमेदवार असणार आहे व जनता कांदोळकरांनाच निवडून देणार आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनता राष्ट्रीय पक्षाचा कारभारास कंटाळलेली आहे मग भाजप वा काँग्रेस असो हे कोविडच्या वेळेवर असो वा पूर्वी लोकांचा विश्वास त्यांच्यावरून उडालेला आहे. राज्यात राजकीय क्रांती घडणार आहे आणि आम्ही हे दोनच मतदार संघ नाही तर आम्ही 8 मतदार संघ टार्गेट केलेले आहेत अशी माहिती कांदोळकर यांनी बोलताना सांगितले. या मतदार संघाचा विचार आताच नको तर येणाऱया काळात सर्व काही स्पष्ट होणार आहे असे ते म्हणाले. क्षत्रीय पक्ष म्हणजे नवीन पक्ष तयार होणार आहे असे त्यांनी सांगितले. हल्लीच थिवी मतदार संघासाठी जाहीर करण्यात आलेल्या समितीत भाजपच्या पराभवासाठी छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या अनेक अशा लोकांचा भरणा करण्यात आली असल्याचे श्री. कांदोळकर म्हणाले. हळदोणा ही आपली जन्मभूमी आहे. या गावात बारीक सारीक गोष्टी माहीत आहे. किंबहुना येथील कानाकोपऱयाचा आपला दांडगा अनुभव असल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. दरम्यान हळदोणा मतदार संघाला एका बहुजन नेत्याची गरज आहे. आणि लोक इच्छेनुसार आपण येत्या विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्यरित्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुढील राजकीय खेळी कशी राहणार तसेच या कामात नवीन पक्ष स्थापन करण्यास कोण आपले सोबतीला असतील. या गोष्टीची योग्य वेळीच माहिती देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार कांदोळकर यांनी यावेळी दिली.