पालकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांची 30 टक्के फी कमी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक स्थिती कोलमडली असताना तसेच सरकारने आदेश देऊनही स्कूलच्या प्रशासनाने फी भरा, असा अट्टहास केला आहे. तेंव्हा तातडीने संबंधित शाळेच्या संचालकांना याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारने मागील वषी 30 टक्के फी कमी करावी, असा आदेश दिला होता. मात्र संपूर्ण फी भरा म्हणून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील वषीचा निकाल देखील देण्यात आला नाही. ऑनलाईनद्वारे शिक्षण दिले जात आहे. फी भरली नाही तर ऑनलाईनच्या त्या ग्रुपमधून विद्यार्थ्यांना डिलिट करण्यात येत आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा तातडीने संबंधित शाळेच्या संचालकांना याबाबत सूचना करावी आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
जिल्हाधिकाऱयांसह प्रादेशिक आयुक्त, बीईओ, डीडीपीआय यांनाही निवेदन देण्यात आले. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन दिले. यावेळी पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.