सिंगल चार्जवर स्कुटर धावणार 116 किमीचे अंतर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एथर एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरु झाली आहे. कंपनीने सुरुवातीला बेंगळूरमधून याचा प्रारंभ केला आहे. यामध्ये एथर 450 एक्स या गाडीचा समावेश होणार आहे. सदरचे उत्पादन हे मेड इन इंडिया स्कूटरपैकी एक आहे.
एथरचे नाव इव्ही स्टार्टअप याने ओळखले जाते. एथर 450 एक्स दोन मॉडेलमध्ये येते. यामध्ये 450एक्स प्लस आणि 450 एक्स प्रो याचा समावेश आहे. या दोन्ही स्कूटर्सची किमत वेगवेगळी आहे.
मॉडेलनुसार किमती
एथर 450 एक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किमत आता 1,32,426 रुपये (एक्स शोरुम) आहे. ज्यामध्ये एथर 450 प्लसची किमत ही 1,13,416 रुपये (एक्स शोरुम) आहे.
फिचर्स
एथर 450 एक्स तीन रंगामध्ये येणार आहे. यामध्ये पांढरा, मॅट ग्रे आणि ग्लॉस मिंट ग्रीन यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लायटिंग, कंफर्ट सीटसोबत उपलब्ध होणार आहे. विविध कनेक्टेड फिचर्सची सोय यात आहे. म्युझिक, कॉलिंगसाठी टच स्क्रीनची सोय आहे.