तारेला स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची दाट शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
शहराचा विकास करण्याकरिता सर्वत्र खोदाई करण्यात आली. तसेच नव्याने रस्ते, डेनेज, गटारी यांचे कामदेखील करण्यात आले. याबरोबरच पादचाऱयांना सोयीस्कर व्हावे, यासाठी पेव्हर्स घालून फूटपाथदेखील तयार करण्यात आला. मात्र आता फूटपाथवरून जाणे पादचाऱयांच्या जीवावर बेतले आहे. येथील आरपीडी महाविद्यालयाजवळील पथदिपांसाठीच्या विद्युतवाहिन्या फूटपाथवर तशाच पडल्याने नागरिकांना येथून ये-जा करणे कठीण बनले आहे.
आरपीडी महाविद्यालयाजवळ स्मार्ट सिटीचे काम करण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्ण झाले तरी काही पथदिपांसाठी घालण्यात आलेल्या विद्युतवाहिन्या फूटपाथवर तशाच टाकण्यात आल्या आहेत. तसेच येथील शोभेच्या पथदिपाला विद्युतवाहिनींचे कनेक्शन देण्यात आल्याने विजेची तार फूटपाथवर पडलेली निदर्शनास येत आहे. त्यामुळे या तारेला स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
या भागातील नागरिक मॉर्निंग आणि ईव्हनिंग वॉकसाठी फूटपाथचा वापर करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्मयता असून नजरचुकीने कोणाचाही पाय या तारांवर पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले आहे.