सैनिक घेत होता पॅराशूटचे प्रशिक्षण
‘लँड कर दो जग्गा भाई’ असा संवाद असलेला पॅराग्लायडिंगचा मजेशीर व्हिडिओ पॅराशूटचे नाव घेताच आठवू लागतो. अमेरिकेतही अशीच एक मजेशीर घटना घडली आहे. येथील एका सैनिकाने चुकीचे लँडिंग केले आहे. हा सैनिक एका घराचे छत तोडून थेट किचनमध्ये लँड झाला आहे.
ही घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील आहे. तेथे एका ब्रिटिश सैनिकाचे पॅराशूट प्रशिक्षण सुरू होते. ऍटास्केर्डो येथील एका घरावर चुकून तो लँड झाला. अचानकपणे घराचे छत तोडून थेट किचनमध्ये कोसळला.
किचनमध्ये कोसळलेला सैनिक बेशुद्ध झाला होता. शुद्ध आल्यावर वेदना होत असलेल्या सैनिकाला त्याला झालेली जखम दिसत नव्हती. सुदैवाने या घटनेवेळी घरात कुणीच नव्हते. घराचे अधिक नुकसान झालेले नसल्याचे घरमालकाने म्हटले आहे. सैनिक थेट छत तोडून किचनमध्ये कोसळला होता.