बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा अत्यंत लवकरच अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होणार आहे. याचमुळे तिने मध्यप्रदेशात विशाल फुरिया यांचा चित्रपट ‘छोरी’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. याचे चित्रिकरण भोपाळपासून 150 किलोमीटर अंतरावरील पिपरिया भागात पार पडले आहे. बायोबबल चेन कायम ठेवण्यासाठी नुसरतने पिपरिया येथेच वास्तव्य करत चित्रिकरण केले आहे.
पिपरिया येथेच चित्रपटाचे 70 टक्के चित्रिकरण झाले आहे. परिसरातील ऊसाचे मळे आणि घनदाट जंगलात हे चित्रिकरण झाले आहे. या दृश्यांमुळे चित्रपटातील हॉररचा प्रभाव वाढत असल्याचे दिग्दर्शकाकडून सांगण्यात आले. पिपरियासोबतच भोपाळमधील 4 ठिकाणी नुसरतने चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. सीहोर भागाचीही चित्रिकरणासाठी निवड करण्यात आली होती.
चित्रिकरणावेळी सदस्य पीपीई किट घालून असायचे. बायोबबलमध्ये एखादा कर्मछारी भोपाळ येथून पिपरिया येथे आल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. अहवाल मिळाल्यावरच त्याला चित्रिकरणात सामील होण्याची अनुमती होती. या सर्व प्रकारात नुसरतने कधीच आढेवेढे घेतले नाहीत.