प्रतिनिधी/ सातारा
रविवारी सातारा शहरात विकेंड लॉकडाऊन असल्याने शनिवारी ज्या हॉकर्सधारकांनी शासनाचे नियम पाळतो असे सांगुन दुकाने बंद ठेवली होती. त्याच हॉकर्सधारकांनी रविवारी सकाळी आपली दुकाने उघडी ठेवली. शहरातील इतर सर्व व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. शहर व शाहुपूरी पोलिसांनी शहरात फिरुन वॉर्निंग दिली तसेच व्यापाऱयांचे शटर डाऊन होते. विकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने काही सातारकरांनी कास परिसरात भटकंती केली.
अजूनही सातारा जिल्हा पूर्णपणे खुला करण्यात आलेला नाही. काही निर्बंध आहेत. त्यामध्ये रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. विकेंड लॉकडाऊन असल्याने शहरातील बहुतांशी सर्वच व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी व्यापाऱयांना वॉनिंग दिल्या गेल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, शहरातील तहसिल कार्यालयाच्या पाठीमागील हॉकर्स धारकांनी शनिवारी आम्ही शासनाचे नियम पाळतो असे सांगत विकेंड लॉकडाऊन पाळला गेला होता. तो रविवारी नियम मोडल्याचे दिसत होते. दरम्यान, सातारा शहरातील व्यापाऱयांनी विकेंड लॉकडाऊनच्या अनुषंगाने कास परिसरात निसर्गाचा आनंद घेतला.