पुणे/ प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे, अशी माहिती होती. पण आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव असल्याचं म्हंटलं आहे. राजू शेट्टींना दिलेला शब्द पळाला आहे, असेही पवार यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.