रंगकर्मींचे सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन, 15 सफ्टेंबरपर्यंत नाट्यगृह सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी/ कोल्हापूर
कोरोना कालावधीमध्ये नाट्यगृह बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 1 सफ्टेंबरला नाट्यगृह सुरू करण्याचे आश्वासन देवूनही सरकारने रंगकर्मींच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सांगितिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी. 15 सफ्टेंबरपासून नाट्यगृह सुरू करावी, या मागणीसाठी आणि सरकारच्या निषेधार्त रंगकर्मींनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहासमोर कलेचा बाजार मांडून प्रेक्षकांकडून मदत मागितली. यावेळी प्रसाद जमदगणी, धनंजय पाटील, सुनील घोरपडे, समीर पंडीतराव, महेश सोनुले, मनोज जोशी, समीर भोरे आदी उपस्थित होते.