फलक हटविला : काहीकाळ तणावाची परिस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी सकाळी आरपीडी क्रॉस येथे काही कन्नड कार्यकर्ते जमा होऊन तेथे फलक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळला. आरपीडी सर्कलचे नाव बदलून श्री राजा वीर मदकरी नायक यांचे नाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. फलकही बसविण्यात आला. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तो फलक काढला. परवानगी घ्या त्यानंतर फलक लावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे तातडीने मोठा पोलीस फौजफाटा मागविण्यात आला. कोणतीही परवानगी नसताना आम्ही फलक लावू देणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ते कन्नड कार्यकर्ते तेथून माघारी फिरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन घोषणाबाजी केली आणि निवेदन दिले.