प्रतिनिधी / सातारा :
सातारा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल काही दिवसांपासून वाजू लागले आहे. आता शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने सातारा शहरातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी (दि. 4) दुपारी 2 वाजता साताऱ्यातील समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व मेळाव्याचे संयोजक सचिन मोहिते यांनी दिली.
या मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील आणि जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.