प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या एसजीपीडीए मासळी मार्केट परिसरात उभारल्या जाणाऱया बायोमिथेनेशन प्रकल्पासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 15 ऑक्टोबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार असल्याची माहिती पालिका अभियंता दिनिज डिमेलो यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. एका महिन्याच्या मुदतवाढीसाठी कंत्राटदार कंपनीने केलेला अर्ज पालिका अभियंत्याकडे होता. ‘तरुण भारत’ने सोमवारी यासंदर्भातील वृत्त दिल्यानंतर सदर मुदतवाढ देण्यात आली.
मडगाव पालिकेचा पहिला 5 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रक्रिया लघुप्रकल्प सहा महिन्यांनंतर 30 सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात येणार होता. मात्र पावसाळा व मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळामुळे काम खोळंबल्याने प्रकल्प?ाचे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने आणखी महिन्याभराची मुदत वाढवून देण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली होती.
सदर प्रकल्प उभारण्यासाठी मडगाव पालिकेने पाच महिन्यांपूर्वी आदेश जारी केले होते. पुणेस्थित उर्जा बायो सिस्टम प्रा. लि. यांना एसजीपीडीए मार्केटजवळ एक लघुप्रकल्प स्थापित करण्याचे कंत्राट देण्यात ?आले आहे. सदर कंपनीच्या 2.40 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली होती. दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचा (एसजीपीडीए) मासळी बाजार येथे हा प्रकल्प उभारला जात आहे. 180 दिवसांत प्रकल्प स्थापित करून कार्यान्वित करण्याचे दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र पावसाळय़ात अडथळे आल्याने काम करणे शक्मय झाले नसल्याचे सदर कंपनीने पालिकेला पत्र पाठवून कळविले होते. एका महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती त्यांनी पालिकेला केली होती. त्यावर कनि÷ तसेच साहाय्यक अभियंत्यांनी सदर मुदतवाढ देण्याची शिफारस करणारा शेरा टाकला असता पालिका अभियंता डिमेलो यांनी 22 रोजी सदर प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले होते. मात्र अभियंता अन्य कामात व्यस्त राहिल्याने सदर सर्वेक्षण होऊ शकले नव्हते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले होते. सदर मुदतवाढ आता देण्यात आली आहे.