देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता : आंतरराष्ट्रीय पातळीवर कारणाचा प्रभाव राहणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बेंचमार्क बेंट क्रूडचे भाव आता जवळपास 85 डॉलर प्रति बॅरेलवर आहे, जे आगामी तीन ते सहा महिन्यापर्यंत साधारणपणे 100 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 100 कच्च्या तेलाचे भाव अंदाजे 100 डॉलरच्या घरात पोहोचल्यास देशातील पेट्रोल बाजारात पेट्रोल व डिझेलचे भाव वर्तमानात असणाऱया किमतीपेक्षा 8 ते 10 रुपये प्रति लिटर महाग होणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
इराकचे तेल मंत्री एहसान अब्दुल जब्बारीच्या माहितीनुसार आगामी वर्षातील पहिल्या आणि दुसऱया तिमाहीत कच्च्या तेलाचे भाव हे 100 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा प्राप्त करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. बेंटचा सध्याचा भाव हा (85डॉलर) असून हा आकडा मागील वर्षापूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. कच्चे तेल साधारणपणे 85 टक्के आयात केले जाते. यामुळे भारतासाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताने बनवली योजना
कच्चे तेल महाग होत असताना देशात पेट्रोलचे भाव 110 रुपये आणि डिझेलच्या किमती या 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. यामुळे विविध ठिकाणाहून ऑईल रिफायनरी कंपन्यांकडून योजना आखत कच्चे तेल आयात करण्याचा व्यवहार करण्यावर भर देत आहे.
भाव वाढण्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील कारणे
- जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे सुरु होत असल्याने ऊर्जा मागणीत तेजीने वाढ होत आहे. थंडी वाढत असल्यानेही अमेरिकेत शेल ऑईलचे उत्पादन घटले आहे.
- पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना आणि त्यांचे सहयोगी देश(ओपेक)यांनी दररोज फक्त 4 लाख बॅरेल उत्पादन वाढविणार आहेत
- याचदरम्यान कोळशाच्या किमती विक्रमी पातळीवर वाढल्याने आणि नैसर्गिक गॅस सलगपणे महाग होत असलयाने कच्च्या तेलाचा अतिरिक्त सपोर्ट मिळत आहे.