रजनीकांत यांच्या कन्येची निर्मिती – जगाच्या प्लॅटफॉर्मवर ऍप पोहचविणार असल्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपली कन्या सौंदर्याचे सोशल मीडिया ऍप हूटे(Hoote) याचे सादरीकरण केले आहे. हे एक व्हॉईस बेस्ड ऍप आहे. सौंदर्या आणि अम्टेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनी पोकाला हे पण सदर ऍपचे सह संस्थापक आहेत. ऍपचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर रजनीकांत यांनी सोशल मीडियावर ‘हुटे हा एक आवाजावर आधारीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो भारताकडून जगभरासाठी दिला आहे. पांढऱया घुबडाच्या आवाजाला हुटे म्हटले जाते. त्यावरुनच हे नाव घेतल्याची माहिती आहे.
या ऍपच्या मदतीने ग्राहक आपले विचार आवाजामध्ये नोट्स करुन शेअर करु शकणार आहेत. तसेच आपल्या पोस्टला मजबूत बनविण्यासाठी बँकग्राउंड म्युझिकचा वापर करता येणार असून गुगल प्लेस्टोअरवर इंस्टॉल करता येणार आहे.
विविध भाषांमध्ये ऍप उपलब्ध
सदरचे ऍप तामिळ, हिंदी, तेलगु, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजरातीसह अन्य 8 भारतीय भाषा आणि 3 आंतरराष्ट्रीय भाषांही सपोर्ट करणार असल्याची माहिती आहे.
वडिलांकडून प्रेरणा
हुटे ऍपची निर्मिती करण्यासाठी मला माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली असल्याचे रजनीकांत यांची कन्या सौंदर्या यांनी सादरीकरणावेळी स्पष्ट केले आहे.
‘हुटे’वापरण्याची प्रक्रिया
हुटे ऍपच्या माध्यमातून जास्तीत जास्त 60 सेकंदांची व्हॉईस नोट पाठविता येणार आहे. रेकॉर्ड पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पोस्टमध्ये एक कूप्शन, बँकग्राउंड म्युझिकसह एक फोटो जोडता येणार आहे. भरपूर प्रमाणात म्युझिक निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये भावनिक, पर्यावरण, नैसर्गिक, धार्मिक आणि नेटिव्हसारख्या वर्गवारीत विभागणी केली असल्याची माहिती आहे.