लंडन
ब्रिटन सरकारने महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नुकतेच एक नवे नाणे सादर केले आहे. पाच पाऊंडचे हे नवे नाणे सादर करण्यात आले असून त्यावर भारताचे राष्ट्रीय फूल कमळही आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हे नाणे मंत्री ऋषी सोनक यांच्या हस्ते सादर करण्यात आले आहे. नाणे गोलाकार असून त्यावर भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. त्यासह महात्मा गांधींचा ‘माय लाइफ इज माय मेसेज’ असा संदेशही त्यावर आहे. दिवाळीच्या निमित्ताने ब्रिटन सरकारने हे नाणे सादर केले आहे. सोने आणि चांदीचा वापर करून 5 पौंडचे नाणे तयार केले आहे. हे नाणे सर्वसामान्यांकरीता वापरासाठी नसेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. हे नाणे खास पद्धतीने तयार केले असून विक्रीकरीता उपलब्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 1 ग्रॅम, 5 ग्रॅम सोन्याचे नाणे असणार असून त्यावर लक्ष्मीची प्रतिमा असेल, असे सांगितले जाते.