बेळगाव : मंगळूर येथे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 17 व्या राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या महिला जलतरणपटू ज्योती होसट्टी यांनी 100 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.
मंगळूर येथे झालेल्या या जलतरण स्पर्धेत 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये महिलांच्या डी गटात ज्योती होसट्टीने द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत दिल्लीच्या सीमा रस्तोगी हिने 1 मि. 43 सेकंद 53 इतका वेळ घेत प्रथम, कर्नाटकाच्या ज्योती होसट्टीने 2.3307 वेळेसह द्वितीय तर दिल्लीच्या जॉक्लीन तेरेसा बर्निसने 2.42.95 वेळेसह तृतिक क्रमांक पटकाविला.
त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ज्योती होसट्टी यांनी यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.