कोहिमा / वृत्तसंस्था
तीन दिवसांपूर्वी नागलँडमध्ये सैनिकांकडून दहशतवादी समजून 14 नागरीकांचाच मृत्यू घडल्याने आता नागालँड सरकार भारतीय सेनेला काही सीमावर्ती राज्यांमध्ये विशेष अधिकार देणारा ‘आफ्स्पा’ कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहे. यासंबंधी नागालँड सरकारची बैठक झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे ही मागणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच सध्या राज्यात सुरु असणारा होर्नबिल सण रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला. 14 निरपराध नागरीकांच्या मृत्यूचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.