नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे प्रथम सरसेनापती (सीडीएस किंवा तीन्ही सेनादलांचे प्रमुख) जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या स्थानी नवीन सरसेनापती नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ही नियुक्ती करण्यासाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी भूसेना प्रमुख जनरल नरवणे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. या समितीने अधिकाऱयांच्या नावांची सूची तयार करण्याचे काम सुरु केले आहे. भूदल, वायुदल आणि नौदल या तीन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी केलेल्या सूचनांनुसार ही सूची बनविण्याचे काम सुरु आहे. लवकरच ही सूची संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना सादर केली जाणार आहे. भूसेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचीची नियुक्ती यापदी होण्याची दाट शक्यता आहे.