नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहातील एकाच वॉर्डातील पाच कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एकाच वॉर्डमधील पाच कैद्यांनी गळफास लावून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये पाचही कैदी बचावले असले तरी त्यांनी स्वतःला जखमी केले आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे समजते. कैदी जखमी झाल्याने त्यांना कारागृह रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक चौकशीअंती हा सर्व प्रकार उघड झाला. तथापि, कारागृह प्रशासनाने कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Previous Article150 कोटी डोसचा टप्पा पूर्ण
Next Article जिल्हा परिषद मैदानाच्या नुतनीकरणाचा घाट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.