प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित जीएसएस कॉलेजमध्ये पी. जी. विभागाच्यावतीने ‘सोलार सायन्स टेक्नॉलॉजी’ हा डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. माधुरी शानभाग उपस्थित होत्या.
प्रारंभी ऐश्वर्या हिने स्वागतगीत म्हटले. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. भरत तोपीनकट्टी यांनी अतिथी प्रा. प्रफुल्ल रुगी यांचा परिचय करुन दिला. प्रा. काजल घोटगाळकर यांनी माधुरी शानभाग व संस्थेचे व्हा. चेअरमन प्रकाश शानभाग यांचा परिचय करुन दिला.
प्रा. शानभाग यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेवून करिअर घडवावे, असे आवाहन केले. प्रफुल्ल रुगी यांनी सुर्यापासून आम्हाला उर्जा मिळत असून जीवसृष्टी आहे तोपर्यंत 100 टक्के सौरउर्जा उपलब्ध आहे, असे सांगितले. सौरउर्जा वापरणाऱया देशात भारत चौथ्या क्रमांकावर असून त्यातील कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत 35 लाखांहून अधिक नोकऱया सोलार सायन्स टेक्नॉलॉजीवर अवलंबून असतील, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश शानभाग यांनी वेगवेगळय़ा शाखांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट केले. रितू डोंगरे हिने आभार मानले. सुत्रसंचालन सुषमा गंगण्णावर आणि सुश्मिता दामोजी यांनी केले. हा कार्यक्रम कॉलेजच्या करिअर गार्ल्डन्स व कौन्सिलिंग सेल आणि फिजीक्स विभाग यांच्यातर्फे पार पडला.