सेन्सेक्स 1545 अंकांनी घसरला, जागतिक नकारात्मक संकेतांचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक नकारात्मक संकेत, अमेरिकेत क्याजदर वाढीच्या बातमीने आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. चालू वर्षातील ही पहिलीच मोठी पडझड असून याचा गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोमवारी दिवसअखेरीस मुंबई शेअरबाजाराचा (सेन्सेक्स) निर्देशांक तब्बल 1,545 अंकांनी म्हणजेच 2.62 टक्केसह 57,491.51 अंकांवर तसेच राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 468 अंकांच्या म्हणजेच 2.66 टक्के इतक्मया जबर घसरणीसह 17,149.10 अंकावर बंद झाल्याचे दिसले. जागतिक बाजारातला नकारात्मक मूड, अमेरिकेत व्याजदर वाढण्याचे संकेत तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार विक्रीवर भर दिल्याचा हा एकत्रित परिणाम शेअरबाजारात मोठय़ा प्रमाणात दिसून आला. शेअरबाजाराने सोमवारी सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदविली असून गुंतवणूकदारांना चिंतीत करून सोडले आहे. सेन्सेक्समधील टाटा स्टील, बजाज फायनान्स, विप्रो व टेक महिंद्रा या कंपन्या मोठय़ा प्रमाणात नुकसानीत राहिल्या आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक व आयटी निर्देशांक घसरणीत राहिला. याचदरम्यान बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 260.48 लाख कोटी रुपयांनी घटले आहे. सोमवारी सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 228 अंकांच्या घसरणीसह व निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. एचयुएल, मारुती व एचडीएफसी हे लाभात राहिले होते.
जागतिक बाजारात युरोप व आशियातील बाजारही घसरणीत होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.5 टक्के तर हँगसेंग बाजारही 1.2 टक्के इतका घसरणीत दिसला. सेन्सेक्समधील सर्व कंपन्या नुकसानीत होत्या. गेल्या 5 दिवसाच्या कार्यकाळात सेन्सेक्समध्ये 3,900 अंकांची घसरण झाली आहे. शुक्रवारी 270 लाख कोटी रुपये असणारे बाजार भांडवल 260 लाख कोटी रुपयांवर आले होते.