प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठय़ाप्रमाणात तिरंगा झेंडय़ांची विक्री होते. बुधवारी होणाऱया प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी झेंडे विक्रीसाठी दाखल झाले होते.
शहरातील अनेक दुकानांतून आणि फेरीवाल्यांच्या गाडीवर विक्रीसाठी झेंडे दिसून आले. तिरंगी झेंडे, बिल्ले, स्टिकर्स, स्टॅण्ड फ्लँग, कॅप, बॅण्ड यासह तिरंगी रंगाच्या टी शर्टची विक्री झाली. आकारमानानुसार 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत तिरंगी झेंडे आणि बिल्ले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुण, विद्यार्थी मोठय़ाप्रमाणात झेंडे खरेदी करतात. त्यामुळे बालचमूही झेंडे खरेदी करताना दिसून आले..