सेपेटरीपदी अनिल हुंदरे यांची निवड
प्रतिनिधी /येळ्ळूर
सुसंस्कार, स्वावलंबन आणि समाज प्रबोधन या विचारावर कार्य करणाऱया येळ्ळूर येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरच्या अध्यक्षपदी शिवाजी सायनेकर आणि सेपेटरीपदी अनिल हुंदरे यांची निवड करण्यात आली.
केंद्राची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन, येळ्ळूर येथे पार पडली. त्यावेळी ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी एस. बी. सायनेकर होते. प्रास्ताविक अनिल हुंदरे यांनी केले. या सभेत विविध पत्रकांचे वाचन करण्यात आले. मागील वषीच्या सभेच्या वृत्तांताचे वाचन उपाध्यक्ष एन. डी. गोरे यांनी केले. अहवाल वाचन शिवाजी सायनेकर यांनी केले.
2021 सालचा ताळेबंद व नफा पत्रकाचे वाचन दिनेश पाटील यांनी केले. सभेमध्ये अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा होवून विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उदय जाधव, प्रकाश अष्टेकर, मनोहर नायकोजी, अनंत मजुकर, पी. ए. पाटील, एन. डी. गोरे यांची भाषणे झाली. संभाजी कणबरकर, सी. बी. पाटील, डी. एन. पाटील, नारायण बस्तवाडकर, नारायण जाधव, परशराम कंग्राळकर, बाळू दणकारे, संतोष अष्टेकर, पी. एच. पाटील, नारायण कुंडेकर, प्रदीप मुरकुटे, यल्लाप्पा देसूरकर, सुरेश पाटील, रामचंद्र कुगजी, रामचंद्र ठुमरे, वाय. एन. पाटील, श्रीधर धामणेकर, प्रमोद जाधव, पंकज जाधव, दत्ता उघाडे, सुधीर मानकोजी आदी उपस्थित होते.
2022 सालासाठी जाहीर केलेली नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे….
अध्यक्ष शिवाजी सायनेकर, उपाध्यक्ष आनंद आप्पाजी पाटील, सेपेटरी अनिल हुंदरे, उपसेपेटरी दिनेश पाटील, खजिनदार संभाजी कणबरकर, क्रीडा प्रमुख सुधीर मानकोजी, जनसंपर्क प्रताप पाटील, सभासद बाळू दणकारे, संतोष अष्टेकर यांची निवड झाली आहे. या सभेचे सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले तर हणमंत पाटील यांनी आभार मानले.