अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 29 जानेवारी 2022, सकाळी 11.30
●बाधितांचे प्रमाण घटू लागले
●जिल्ह्यात नव्याने 1091 जण बाधित
●घरच्या घरी बरे होणाऱ्यांची संख्या मोठी
●कोरोनामुक्तीचा वेग वाढला
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात बाधित वाढ ही कमी होवू लागली आहे. कोरोनामुक्तीचा दर वाढला असल्याने व घरच्या घरीच बरे होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 94च्या आसपास आहे. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात नव्याने 1091 जण नव्याने बाधित आढळून आले असून पॉझिटीव्हीटी 25.51 वर पोहचलेला आहे.नव्याने आढळून येणारे बाधित आणि कोरोनामुक्तींची संख्या यांच्यामध्ये कोरोनामुक्ती झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्ती वाढली
दररोज बाधितांच्या संख्येत चढउतार सुरु आहे. बाधित रुग्ण कमी कसे होतील आणि बाधित रुग्णांवर चांगले उपचार कसे होतील यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे दि.24 जानेवारीपासून कोरोनामुक्तीचा वेग वाढलेला दिसून येत आहे. दि. 24 रोजी 976 जण कोरोनामुक्त झाले होते. दि. 25 रोजी 1921 जण कोरोनामुक्त झाले होते. दि.26 रोजी 1369 जण कोरोनामुक्त झाले होते.दि. 27 रोजी 1188 जण कोरोनामुक्त झाले होते. दि. 28 रोजी 1358 जण कोरोनामुक्त झाले होते. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढु लागले असून ही जिल्हावासियांसाठी दिलासादायक बाब आहे.
घरच्या घरीच बरे होणाऱ्यांची संख्या मोठी
घरच्या घरीच बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दररोज जरी बाधित वाढ होत असली तरीही त्या बाधित वाढीमध्ये जिल्ह्यात सक्रीय रुग्ण हे 7400 च्या आसपास आहेत. त्यापैकी केवळ 430 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकीचे रुग्ण हे घराच्या घरीच उपचार घेत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणाही कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हटी रेट 25.21वर
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 4 हजार 327 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यापैकी 1हजार 91 जणांचे नमूने हे बाधित आले आहेत. जिल्ह्याची पॉझिटीव्हटी 25.21 वर पोहचलेली आहे. जिह्यात जावली 12, कराड 252, खंडाळघ् 66, खटाव 53, कोरेगाव 79, माण 47, महाबळेश्वर 17, पाटण 28, फलटण 134, सातारा 296, वाई 71 असे एकूण 1055 जिल्ह्यातील बाधित आढळून आले आहेत. तर इतर जिल्ह्यातील परंतु जिल्ह्यात उपचार घेणारे नव्याने 35 जण बाधित आढळून आले असून 1090 जण बाधित आहेत.
शनिवारी
नमूने-4327
बाधित-1091
शनिवारपर्यंत
नमूने-24,87,423
बाधित-2,74,681
मृत्यू-6570
मुक्त-2,58,269