वृत्तसंस्था/ पुणे
येथील बालेवाडी क्रीडा सकुंलातील इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारपासून खेळविल्या जाणाऱया 2022 महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये रोहन बोप्पाणा आणि रामकुमार रामनाथन यांना मानांकनात दुसरे सिडेंग देण्यात आले आहे. ही स्पर्धा 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
बोप्पाणा आणि रामकुमार रामनाथन या जोडीने अलिकडे ऍडलेड येथे झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले होते. पुण्यात सोमवारपासून सुरू होणाऱया एटीपी 250 टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत एकूण 16 जोडय़ांचा समावेश आहे. ही स्पर्धा टाटा उद्योग समुहाने पुरस्कृत केली आहे. पुरूष एकेरीत भारताच्या चार टेनिसपटूंचा समावेश आहे. अर्जुन कढे, प्रज्नेश गुणेश्वरन, युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन पुरूष एकेरीत खेळणार आहेत.