वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक्नो कंपनीने आपला पहिला 5 जी स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. सदरच्या फोनचे नाव टेक्नो पोवा 5-जी आहे. यामध्ये 8 जीबी रॅम मिळणार आहे. तसेच यासोबतच 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱयासोबत ट्रिप्पल रियर कॅमेऱयाचा सेटअप मिळणार आहे.
फोनच्या मागील बाजूस प्रसिद्ध फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर सिटी एफसीचा लोगो असणार आहे. टेक्नोमध्ये 6,000एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासह याच्या मदतीने 32 दिवसांमध्ये स्टॅण्डबाय आणि 183 तासाचा म्युझिक प्लेबॅक मिळणार आहे.
भारतामध्ये टेक्नो पोवा 5 जी ची किमत 19,999 रुपये असणार असून 8 जीबी व 128 जीबी रॅम आणि स्टोरेजचा पर्याय यात मिळणार आहे. स्मार्टफोन एथर ब्लॅक कलरच्या पर्यायासह मिळणार आहे. टेक्नो पोवा 5जी येत्या 14 फेब्रुवारी रोजी ऍमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी
फिचर्स
?
अँड्रॉईड 11 आणि एचआयओएस
8.0 वर स्मार्टफोन चालतो
?
स्मार्टफोन 6.9 इंच पूर्ण एचडी डिस्प्लेसह मिळणार आहे.
?
टेक्नो पोवा 5जी मीडियाटेक डायमेंशन 900 एसओसी वर कार्यरत होईल