वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
अखिल भारतीय व्हॉलीबाल फेडरेशनने भारतात 2022 साली जून-जुलै दरम्यान होणाऱया पहिल्या अधिकृत इंडियन व्हॉलीबॉल लीग स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेला आशियाई व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनने अधिकृत मान्यता दिली आहे.
भारतात होणाऱया या पहिल्या व्हॉलीबॉल प्रिमियर लीग स्पर्धेत देशातील विविध शहरातील संघ सहभागी होणार आहेत. प्रँचायझीची संख्या वाढविण्यात आली असून आता ती आठ करण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील अव्वल व्हॉलीबॉलपटूंना विविध आठ संघांचे प्रँचायझी खरेदी करतील. ही स्पर्धा येत्या जून-जुलै दरम्यान घेतली जाणार असून स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच घोषित केले जाईल.