वृत्तसंस्था/ डोहा (कतार)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या खुल्या कतार टेनिस स्पर्धेत कॅरेन कॅचेनोव्हने मॅकडोनाल्डचा पराभव करत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे डॅनियल इव्हान्स, केओन यांनी दुसऱया फेरीत प्रवेश केला आहे.
सोमवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात कॅचेनोव्हने 90 मिनिटाच्या कालावधीत मॅकडोनाल्डचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱया एका सामन्यात डॅनियल इव्हान्सने गेरासिमोव्हचा 6-4, 6-4 तसेच बोटीकने इटलीच्या फॅबियानोचा 6-2, 7-6 (7-5), केओनने अमेरिकेच्या युबँक्सचा 7-6 (8-6), 1-6, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.